उमेद
उमेद
छाटुनिया पंख
म्हणतात घे भरारी
होऊनिया स्वार
त्या वाऱ्यावर
इच्छा खूप होती
मोठी घ्यायची भरारी
मनसोक्त उडण्याची
आकाशी पंख पसरण्याची
केला त्यांनी असा कट
कापलेत माझे पंख
अन् म्हणतात घे भरारी
त्या वाऱ्यावर
कापलेत माझे पंख
तरी ना उमेद नाही
पंख फुटण्याची
वाट मी पाहीन
अन् परत घेईन
आकाशी भरारी
होऊन स्वार
त्या वाऱ्यावर
