STORYMIRROR

Vijay Kadu

Classics

3  

Vijay Kadu

Classics

देवासारखा

देवासारखा

1 min
322

वाग रे माणसा तु, माणसा सारखा

कुणी पाहिलाय देव,देवा सारखा


किती एक ते जन्मले कित्येक मेले

परि ना जन्माला कुुुणी भिमा सारखा


मुडदाड समाजाला चेेतवायला

देह हा झिझवावा चंंदनासारखा


नको रे दाखले ते पुराणातले

तू घडव इतिहास,इतिहासासारखे


बंद होतील बघ,ते वृध्दाश्रम सारे

जरी जन्माला पुत्र,श्रावणबाळा सारखा


जगी रामाचा जयघोष फार झाला

तरी न निपजला, कुणी रामा सारखा


दुख: पिऊन ओठी हसू खुलवायला

नित्य उभा विजु विदुषका सारखा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics