STORYMIRROR

Nalanda Satish

Others

3  

Nalanda Satish

Others

शौर्य

शौर्य

1 min
177

 बाणा करारी

 दुर्दम्य इच्छाशक्ती 

 अभुतपूर्व साहस 

 जिद्दीचा कळस 

 जाज्वल्य देशाभिमान 

 उरी असतो स्वाभिमान 

 निस्सीम धैर्य 

 ह्रदयात शत्रूच्या धडकी भरते शौर्य 

 उदात्त व्यक्तीमत्व

 मनाचं खंबीर नेतृत्व 

 कठोर निर्धार 

रक्षनाला आधार

शौर्य

संकटांना न घाबरता 

न भीता 

दोन दोन हात करायची तयारी 

वास्त्वयाला तोंड देण्याची उर्मी

प्रतिकूल परिस्थितीत 

तटस्थ राहण्याची भुमिका 

आव्हान स्वीकारण्याची मानसिकता 

शौर्य 

कुटुंबाचा, आप्त स्वकीयांचा 

न करता विचार 

सिमेचं जो रक्षण करतो 

तोचं बहादूर 

खर्या शौर्याचा मानकरी 


Rate this content
Log in