STORYMIRROR

Nalanda Satish

Romance

4  

Nalanda Satish

Romance

आठवण

आठवण

1 min
527

तुझ्या आठवणीच्या पुराने 

पुरती वाहुन गेले मी

तुझ्या आठवणींच्या प्रवाहात 

दुरवर निघून आले मी


तुझ्या आठवणीच्या पावसत 

चिंब भिजुन न्हाहुन गेले मी

ओजंळीत होती फुले तरी

सुगंधित ना झाले मी


आठवणीच्या गावात 

एकटीच हुंदडत होते मी

ओघळल्या अश्रुंना 

लपुन वाट दाखवित होते मी


भेटत होतास जिथे तू

खिळून नजर तिथेच विसावते मी

पाठमोर्या तुझ्या आकृतिला 

स्वप्नात हिणविते उगाच मी


राहुन गेल्यात आठवणी 

वळणावर त्या वळुन पाहिले मी

आलास ना तू कधीही 

वाट पाहुन थकले रे मी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance