परी
परी
1 min
240
सुंदरतेच्या आगळ्या वेगळ्या जगातली
पंख असलेली
कुठेही उडत उडत जाणारी
मनासारखा खाऊ देणारी
कल्पनेच्या जगात
हुंडळायला लावणारी
चॉकलेटच्या बंगल्यात घेऊन जाणारी
परी
फुलबागेत फुलपाखरा सोबत
उडायला लावणारी
आईसक्रीमच्या फुलोर्या वर
बर्फाचा जिथे पाऊस पडतो
तिथे अलगद उचलुन नेणारी
परी
मनकवडी
मनातील इच्छा ओळखणारी
जे हवे असेल ते पटकन
आणून देणारी
हवीहविसी वाटणारी
परी
ह्या स्वार्थी जगापासून दुर दुर
घेऊन जाणारी
जिथे अभ्यास नाही
शाळेची परीक्षा नाही
पास नापास ची भिती नाही
फक्त खाने आणि खेळणे
किती सुंदर परी
वाटतं कधी कधी परतचं येऊ नये
परीच्या दुनियेतून
