STORYMIRROR

Nalanda Satish

Others

4  

Nalanda Satish

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
203

निर्सगाचा अनोळखी अद्भूत चित्रकार

नयनरम्य अप्रतिम चित्र बनवून गेला

संमोहित प्रकृतीचा मुक्तहस्ते उधळुनी

इन्द्रधनुष्याचे रंग सजीव उकरून गेला


रानपाखरापासून घ्यावी भरारी उडण्याची

उगवता सूर्य लावतो प्रथम हजेरी उठण्याची

काळ्या मातीची उजवली तेव्हा कुस

अंकुरली विविध बीजे जेव्हा उदरीची


निळ्या विशाल नभाची घेऊनी साथ

उत्कंठीत ऊर्जेचा क्षमतेचा आत्मविश्वास

निर्झर झरा वाहतो आकाशगंगेचा

माणसांचा निसर्गावर अतूट विश्वास


पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे लावण्याची खाण

शुक्राची चांदणी आणते प्रीतीला उधाण

खट्याळ वारा झुलवितो नाजूक स्पर्शाने

कळी लाजते फुलपाखराच्या पंखाने


समुद्र शिकवितो असावी सहनशीलता अंगी

काळी माय धरते मायाममतेच्या पदराखाली

निरभ्र आकाशाचे ओढून पांघरूण

पाखरे निद्रिस्त कोवळी किरणे उशाशी घेऊन


Rate this content
Log in