STORYMIRROR

Nalanda Satish

Others

4  

Nalanda Satish

Others

गुरुचे महत्व

गुरुचे महत्व

1 min
323

गुरु आहे ज्ञनाचे भंडार

शिष्यांचा जे करतत उध्धार 

गुरु शिवाय नाही तरनोपाय 

गुरु आहेत जीवनाचा आधार 


गुरु आहेत ज्ञानाचा प्रकाश 

तेवत असणारा नंदादीप 

सुगम करतो वाट जीवनाची 

उंचच उंच असा आकाशदीप 


गुरु आहे स्वछ वाहणारी नदी

डोईवरचे छत जसे निरभ्र आकाश 

पहाडाची निड़र मजबूत छाती 

किरणांमधून वाहे जणू प्रकाश 


गुरु आहे तेजपुंजाचा गुच्छ 

त्यांच्यामुळे गाठातो आपण धेय्य

सन्मानाची ही पायवाट 

नाही दुसरा पर्याय 


गुरु आहे पारस मणी 

धोंड्याचे सोने करतो

शब्द पडताच कानी ज्यांचे 

अज्ञानाचा समूळ नाश होतो


Rate this content
Log in