STORYMIRROR

Ratnesh Chaudhari

Tragedy

3  

Ratnesh Chaudhari

Tragedy

नका करू आम्हास पोरके

नका करू आम्हास पोरके

1 min
210

बाबा तुझ्याविना जगावे कसे

नका करू आम्हास पोरके

तगमग जीवाची होते पार

कुठे शोधती तुझे लाडके.......।। ध्रु।।


मायेचा पदर धरून चाललो

एवढे पावले तुमच्या सोबत

आज अचानक पदर खेचला

करून पोरके सारा धनगोत...बाबा तुझ्याविना।।१।।


आधार आमचा तूच पोलादी

वितळून जलात तू सामावला

आलिंगनास मूर्ती हो शोधतो

का सोडूनी गेलास तू आम्हाला ...बाबा तुझ्याविना।।२।।


जत्रेच्या आठवणी मना छळती

खांद्यावरची सफर ती सुखाची

मनात येताच नेत्र हो डबडबती

भूतकालीन क्षण जेव्हा स्मरायची...बाबा तुझ्याविना।।३।।


काळ्या आईला कसणारा तू

एवढा कसा निर्धास्त निजला

आरोळी चहूकडे ठोकून तरी

का उठत नाहीस आजमितीला...बाबा तुझ्याविना।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy