कविता
कविता

1 min

54
तिजसाठी शब्द रुंजती
मनास पाझर फोडुनी
तिज साकार रूप देण्या
ओले चिंब शब्द ओघळत
अलगद रुसून बसणं
एखाद्या तोकड्या शब्दाने
शब्द जोडीला रुसण्यावर
भरभरून येते तिज रूपावर
एकदा का बोलली यामकाने
जिव्हा पल्लावासम लुसलुसते
कर्णी रसिक्तेची झालर
मनावर रेलूनिया जाते
अंती नाव सांगण्यावर मौन
पोखरून जावे अंतःकरणास्तव
लव्हाळा परि लचकत विचकत
कविता नामक ध्वनी येई कर्णावर
कविता अगं ये पुन्हा भेटशील
मृदू शब्द तुझे हृदयी लगटले
तुझ्या पाऊलखुणा वरून
पसाभर सुमने वेचिले