Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ratnesh Chaudhari

Romance Others

3  

Ratnesh Chaudhari

Romance Others

ऋणानुबंधाच्या स्मृती 💞

ऋणानुबंधाच्या स्मृती 💞

1 min
222


नजरेतील अनुराग सखे,

हृदयास खुणवी लडीवाळपणे.....!

कधी आणि कसा?

तुझ्या हृदयात सामावलो ?

हे मजला कळलेच नाही......!

हृदय माझे असून तुझे कसे?

आणि तुझे असून माझेच आहे असे का वाटते?

हे आजही न सुटणारे कोडेच जणू....!.!

प्रितीच्या झुल्यावर झुलता झुलता,

कल्पनेच्या दुनियेत शिरत गेलो......!

भुंग्यावाणी काष्ठ पोखरत एकमेकांत पार

गडत गेलो दोघेही..!

पण शुद्ध मनाच्या अवस्थेने, गंभीर वळण निर्मिला. 

तेव्हा एकमेकांपासून अलग,

भाव विश्व तयार झाला......!

वाटा बदलल्या, ध्येय बदलले, बदललो दोघेही...!

मात्र हृदय अदलाबदल झाले, ते राहिले तसेच,

म्हणुनी आजही स्मृतींच्या हिंदोळ्यावर,

तासनतास मन अंदोलीत होत स्वार होत असते......!

ह्याच ऋणानुबंधाच्या हव्या हव्याशा स्मृती,

अलगदपणे तरंग उठवतात एकटेपणात.......!

मग क्रमवार उसवत बसतो, तिचा स्पर्श आणि

उपस्थितीचा भास समजून, 

मनोमन गदगद होत असतो......!

असो काव्य लेखन करतांना देखील,

तीच गंमत घडत आहे माझ्यासोबत......!

असे प्रेम असते, जे सुखद अनुभव देते,

तसे दुःखद चटके ही देत असते.......!

हीच तर प्रेमाची आठवण जीवन शिकवून,

परिपूर्ण बनवते .....!


Rate this content
Log in