STORYMIRROR

Ratnesh Chaudhari

Others

3  

Ratnesh Chaudhari

Others

बैल पोळा

बैल पोळा

1 min
23

सण धवळ्या काळ्याचा

चला साजरा करूया

ऋण व्यक्त करण्याचा

आज दिवस आया


स्नान करून सुंदर

तन मोहक जाहलं

डोळे भरून पाहतो

माझ्या जोडीचे नवलं


बैल घूंघुर माळांनी

साजे नंदिवानी रूप

अंगी टाकुनिया झुल

वाटे मजला अप्रूप


तीक्ष्ण शिंगांचा तो डौल

चाल त्याची ऐटदार

मन प्रफुल्लित होई

रूप त्याचे मजेदार


पूजा विधी आटोपून

देई गवत खायाला

खीर पुरण पोळीचा

केले गोड जेवणाला 


बैल पोळ्याचा उत्सव

गुण्या गोविंदाने केले

काळया आईचे पाईक

जणू कृतकृ्त्य झाले


Rate this content
Log in