माझे बाबा
माझे बाबा


आम्हा भावंडांचा
छत्र तो हरपला जगाचा रंगमंच
अर्ध्यावर सोडून गेला
जन्मदाता माझा कायमचा रुसला
सांगा, 'बाबा' अशी हाक
मारू मी कुणाला?
शिस्त अन् संस्कार देऊनी
मोठे केले मजला,
कष्ट करूनी घास भरविला खरा;
आज हातांचा
स्पर्शच संपला
सांगा, 'बाबा.....'
मज आठवते काटकसर
संसारासाठी पै पै जमवला
मेहनतीला फळ
आलेय खरे, आज
रोखपालच धरेच्या व्यवहारात गडला
सांगा, 'बाबा.....'
सुख-दुःखात आईच पडद्यापुढे
पण साथ तुमचीच
पडद्याआडून आईला
देहरुपी अस्तित्व संपल्यावर
हृदय मात्र पुरता हेलावला
सांगा, 'बाबा....'
कष्ट-मेहनतीने देह खंगून
अर्ध्या वाटेतच सोबत सोडून गेला
खांद्यावर ओझं वाहत वाहत
बाबा माझा काळ्या आईच्या
कुशीत निजला
सांगा, 'बाबा....'