Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ratnesh Chaudhari

Romance

3  

Ratnesh Chaudhari

Romance

ललना

ललना

1 min
678

हिरवी साडी नेसून तिला लावली झालर लाल ग

लग्नाचा रुबाब पाहून तुझा, वाटलीस लई भारी माल ग

साऱ्यांची नजर, हाय तुझ्यावर

मोरपंखी साडीत , रूप मजेदार

तुझ्या साडीचा पदर सुंदर लाले लाल ग

लग्नाचा रुबाब पाहून तुझा, वाटलीस लई भारी माल ग

ऐटीत चालणे, टकमक बघणे

कमरेचा सुडौल, नजरेचा कौल

तुझ्या चालण्यात मयुरा ताल ग

लग्नाचा रुबाब पाहून तुझा, वाटलीस लई भारी माल ग

लावण्याची खान, होऊनी बेभान

रूपाचा मामला, सख्या ही थांबला

तुझ्या ओठांची पाहून बोलकी कमाल ग

लग्नाचा रुबाब पाहून तुझा, वाटलीस लई भारी माल ग

सागर वेणी , करुनी फणी

हृदयी शिरली, मनात भरली

रूप पाहून तुझा झालो मी बेहाल ग

लग्नाचा रुबाब पाहून तुझा, वाटलीस लई भारी माल ग

Rate this content
Log in