तू मोगरा...
तू मोगरा...

1 min

415
माझ्यावरी
चिडणारा...
तू मोगरा
रडणारा...
अश्रू माझे
पुसणारा...
तू मोगरा
रुसणारा...
प्रिया, सखा
भासणारा...
तू मोगरा
हासणारा...
केसामध्ये
सजणारा...
तू मोगरा
लाजणारा...
पावसात
नाचणारा...
तू मोगरा
रे गाणारा...
श्वासकुपी
खोलणारा...
तू मोगरा
बोलणारा...
मनोमनी
फुलणारा...
तू मोगरा
खुलणारा...!!
सुगंधात
पोहणारा...
तू मोगरा
मोहणारा...
हृदयात
मावणारा...
तू मोगरा
भावणारा...!!