तुला पाहते रे...!!
तुला पाहते रे...!!


शब्द ओंजळीत घेवून
भावना पानावर उमटवून
लेखणी ही माझी
तुला पाहते रे...
शब्द शब्द ओवून एक
गीत मी गुंफले अन्
गीत ते माझे
तुला पाहते रे...
शब्दांनीच जुळलं नातं
शब्दांचीच तयाला साथ
सांगण्या हे भाव आज मी
तुला पाहते रे...
शब्दांनी वेचली प्रेमाची फळं
जणू काही गोड रसाळ
चाखावया चव ती ,मी
तुला पाहते रे...
शब्द माझा सोबती
शब्द माझ्या प्रेमाचा मोती
शोधावया तो सुंदर मोती, मी
तुला पाहते रे...
तुला पाहते रे...