क्षण काही सुखाचे, क्षण काही...
क्षण काही सुखाचे, क्षण काही...
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे
आयुष्यात या रोजच येतात, रोजच जातात...
नव्या गोष्टींना ते एक वेगळंच उधाण आणतात
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
निसटली जरी वाळू एकात एक मिसळून राहायचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
आदळूनी लाटांपरी पुन्हा सागरी एक व्हायचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
समजून उमजून साऱ्यांना फुलांपरी जपायचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
एक कण असेल जरी साऱ्यांनीच चाखायचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
एकाने रागावले तरी दुसऱ्याने मनवायचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
मदतीला एकमेकां घोड्यासारखे धावून यायचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
कधी हसऱ्या शब्दांचे तर कधी बोचऱ्या भावनांचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
एकमेकांसवे सारे आयुष्य घालवण्याचे
क्षण काही सुखाचे तर क्षण काही दुःखाचे...
क्षणोक्षणी तयांना आठवणींच्या कुपीत हळुवार साठवायचे...
वाटलेच घ्यावा जरा विसावा,
त्या आठवणींच्या कुशीत मग अलगद, शांत निजायचे...!!