STORYMIRROR

Harshada Pimpale

Others

3  

Harshada Pimpale

Others

आज मी स्वतःला शोधण्या निघाले..

आज मी स्वतःला शोधण्या निघाले..

1 min
180

मी निःशब्द कळी मंद डोळ्यातून बोलायला निघाले...

माझ्याच अंतरंगातला श्वास मी रंगवायला निघाले...

जगाच्या या गर्दीत

आज मी स्वतःला शोधण्या निघाले...


मिटूनी लोचने मी स्वतःत हरवून जायला निघाले...

माझ्या आयुष्याची गाणी मी सूरात गायला निघाले...

जगाच्या या गर्दीत

आज मी स्वतःला शोधण्या निघाले...


निळ्याभोर आकाशी मी पक्षांसम स्वच्छंदी उडायला निघाले...

नभी चमचमणाऱ्या चांदण्यातला मी चंद्र व्हायला. निघाले...

जगाच्या या गर्दीत

आज मी स्वतःला शोधण्या निघाले...


बेधुंद बरसुनी मी तनमन फुलवायला निघाले...

माझ्याच गुलाबी गालांवरच्या खळा मी नव्याने खुलवायला निघाले...

जगाच्या या गर्दीत

आज मी स्वतःला शोधण्या निघाले...


मनमुराद आठवणींना कुशीत घेऊन मी निजायला निघाले...

दरवळणाऱ्या त्या सुगंधी स्वनुरागात मी माझ्या पापण्या

भिजवायला निघाले...

जगाच्या या गर्दीत

आज मी स्वतःला शोधण्या निघाले...


माझी स्वप्ने, माझे लावण्य मी काव्यातून फुलवायला निघाले...

शब्दांत शब्द गुंफूनी मी माझे नवे आयुष्य सजवायला निघाले...

जगाच्या या गर्दीत

आज मी स्वतःला शोधण्या निघाले...!!


Rate this content
Log in