STORYMIRROR

Harshada Pimpale

Romance Classics

3  

Harshada Pimpale

Romance Classics

घेऊन चांदण्यांना सोबतीला

घेऊन चांदण्यांना सोबतीला

1 min
188

घेऊन चांदण्यांना सोबतीला

मैफिल स्वरांची सजवुया...

हातात हात घेऊनी सख्या

जुन्या आठवणींना आर्जवुया...


कितीक रुसल्या कळ्या

तरी फुलांना फुलवूया...

हिंदोळ्यावर बघ सख्या

रे मनसोक्त झुलवुया...


धोधो कोसळतो दिवसा

राती थोडे मौन पाळूया...

जाईजुईचा करुनी गजरा

माझ्याच काळ्याभोर केसात माळूया...


मनामनाने मनामनाशी

मोकळा संवाद साधूया...

स्वप्नांचे हसरे ईमले रे

आपल्या अंगणात बांधूया...


कितीक हळवेपण भावनांचे

डोळ्यात अलगद दाटून येऊया...

पुसुनी ती वेडी आसवे सख्या

बावऱ्या नेत्रराहींना मिटून घेऊया...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance