तुझीच आठवण
तुझीच आठवण
कोमेजले आहे सारे आता,माहीत असूनही
का मी फुलांमध्ये गन्ध शोधत आहे
लावूनी पंख फुलपाखरांचे इवले इवलेसे
का मी पुन्हा तुझ्याच पाऊलखुणा शोधत आहे
विरले आहे आता सारे माहीत असूनही
का मी पुन्हा पापण्यात स्वप्न रंगवत आहे
घेऊनि थोडे रंग उसने नभातले इंद्रधनुतून
का मी स्वप्नात पुन्हा तुलाच रंगवत आहे
अडखळलेले शब्द सारे अबोल ओठातून फुलवून
का मी पुन्हा काव्याच्या लाटांवरून पाणी उधळत आहे....

