STORYMIRROR

UMA PATIL

Romance

4  

UMA PATIL

Romance

सख्या, प्रीतझुला दे रे

सख्या, प्रीतझुला दे रे

1 min
26.9K


मी सजले मराठमोळी

राजबिंडे तुझे रूप

हृदय अर्पण तुला

राजसा, आवडतो खूप


बोल काहीतरी प्रियकरा,

राहू नकोस चूप - चूप

हातात घेऊन हात

पळून जाऊ गुपचूप


तू उधाणलेला दर्या

मी नागमोडी नदी

गर्द राना-वनांत

भेट ना मला तू कधी


रात्री चंद्र दिसतो तुझ्यात

दिवसा तूच सूर्य माझा

स्वीकार मला जन्मभर

हातात घेते हात तुझा


काळीज माझं धडधडतं

चंद्र ही नभी उगवला

तू ही ये लवकर आता

मनात मोगरा दरवळला


मी आतुर धरिणीसारखी

पावसासारखा तू ये रे

घे घट्ट मिठीत मला तू

सख्या, प्रीतझुला दे रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance