तुला भेटेनचं पुन्हा...
तुला भेटेनचं पुन्हा...
आठवता ते क्षण हवहवेसे , लोभसवाणे ..
दूरदेशी पक्षींन उडाली प्रेम फितूर ...
पापणी- पापणीतुन झरते ते गहिवर
भेटण्याची आस निरंतर,मन अतुर...
चिंब - चिंब मन , गहिवरला आसमंत
स्वप्न मनीचे हवेत विरले घरट्याचे ...
मनी कोरलं आठवांचं टिपूर चांदण
दिल्या - घेतल्या त्या शपथाचं काय झालं ?
जीवापाड जपलंय तू दिलेले प्रेमाचं आंदण
धुके दाटले विरहाचे धुंद होत्या दाहीदिशा ...
होतीस तू रुपगर्विता प्रेमळ ,सालस, हवीहवीशी
आश्वासक छाया होतीस , स्वप्नातली वास्तवदर्शी
उधळीशी मोती जणू तू हसताना ...
चंद्र नभी झुरतसे तुला पाहताना
मनी उठते काहूर स्मृती तुझ्या जागवताना ,
प्रीतीचा तो अनमोल ठेवा हृदयी जपताना ...
वाटते मज पुन्हा जन्म यावा हा
अन तुझ्याच पोटी जन्म घ्यावा ...
तू यशोदा अन मी लाडका कान्हा
आश्वासीतो मी ग तुला भेटेनचं पुन्हा...