तुझी ती छळणारी नजर...!!
तुझी ती छळणारी नजर...!!
तुझी ती छळणारी नजर आजही आठवतेय मला......
इतका आकंठ बुडाला होतास तू त्या वेदनांच्या गर्तेमध्ये....
की,होणाऱ्या नव्या जखमांचही तुला काहीच भान नव्हतं....
चेहऱ्यावर मात्र इतरांना उत्साह देणार ते तेज
कायम होतं...
ओठांवरच हसुदेखील इकडच तिकड झाल नव्हतं....
पण तुझ्या डोळ्यात ढगांच दाटण काही थांबल नव्हतं....
ढग दाटले होते रे ,पण तु बरसला नाही....
तुझ्या वेदनांचा दाह कुणालाच कळला नाही...
तुझ्यासाठी कुणी साधा आवंढाही गिळला नाही....
वाटल होत,
नजरेला तुझ्या नजर मिळवून तुला घट्ट मिठीत घ्यावं...
वेदनांच्या गर्तेतून तुला बाहेर काढावं...
पण तुझी ती छळणारी नजर वळली होती मला......
तुझ्या जगण्याची ती वेडी रित
अन् प्रियेला त्रासापासून जपणारी तुझी
ती अबोल प्रित कळली होती रे मला....
तुझी ती छळणारी नजर आजही आठवतेय मला....
आजही आठवतेय मला...!!