बाभळीच्या भावना
बाभळीच्या भावना


गुलमोहरासारख
तुझ्यावर
कुणी इतक प्रेम
करत नाही...
तरीही त्याला पाहून
तू हिरमुसत
नाहीस...
ऊन्हाचा तो चांदवा
गुलमोहोराला
लाजवतो...
त्या चांदव्याला सोबत
म्हणून तू
बासरी वाजवतो...
काट्यांचा सहवास
तुला
तरी तू गुलमोहोराचे
आयुष्य सजवतो...
गुलमोहोराच्या
आनंदात
तू कधी अश्रुही
गाळत नाहीस...
बाभळीच्या झाडा
तुलाही आहेत काटे
तरीही तू इतरांना
जखमा करीत नाहीस...
पण का कोण जाणे?
मोगर्याचा तो
सुगंधी गजरा
हल्ली तू प्राजक्ताच्या
केसातही माळत नाहीस...
तुमच्या त्या मैत्रीचा सुगंध
आता पहिल्यासारखा
दरवळत नाही...
रात्रीही काळ्या आकाशात
तो शशी,तो मयंक,
तोची चंद्रमा
हसत नाही...
ते प्रेमाच शुभ्र
चांदणंही
चमचमत नाही...
खर काय ते सांगना
की तुझ अन् तिचं
आता जमत नाही...
कळी प्राजक्ताची
रुसली तुझ्यावर..
की तू तिच्यावर...
काही एक उमगत
नाही...
वाद झाले जरी
प्राजक्त अन् तुझे
तरी अबोला धरला
त्या
अबोलीने...
अजाणत्या अबोलीला
एक प्रश्न सतावला...
काय ती जादू अशी रे
सांगना
की तू भुललासी
त्या लालमंद
गुलमोहोराला....
रंगछटा ही गडद का त्याची
इतकी
की,
प्राजक्ताची शुभ्र फुलं
त्या गुलमोहोरासमोर
तुला फिकी वाटावी....?
सारेच निश:ब्द...
अचानक सरी
ओथंबल्या...
अन् तुझ्या
डोळ्यात गुलमोहोर
साठला...
मनात प्राजक्त
दाटला...
अबोलीचा रागही थोडासा
आटला...
मात्र साऱ्यांनाच हा
तुझ्या संवेदनांचा
बाजार वाटला...
बाजार वाटला...!!