आयुष्य...
आयुष्य...


कधी कधी असं वाटतं...
की झाडासारखं आयुष्य झालंय...
कितीही घाव झेलले...
तरी वेदना सहन करून आपण
थंडगार मायेची सावली देणं थांबवत नाही...!!
पण कधी असंही वाटतं...
की एखादं वादळ यावं
आणि कोलमडून जावं...
म्हणजे वेदना शांत होतील...
कायमच्याच...!!
कुणाचे घाव झेलावे लागणार नाही....
आणि कुणी मायेच्या सावलीची
अपेक्षाही करणार नाही...!!