STORYMIRROR

Sagar Nadgouda

Drama Fantasy Others

4  

Sagar Nadgouda

Drama Fantasy Others

आमची एस टी

आमची एस टी

1 min
356

एस टी संप चालला होता त्या वेळेची एस टी ची कळालेली किंमत किंवा गरज मोजक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न....


धावत होती रस्त्याने लालपरी 

तेव्हा थोडयांना वाटत नव्हती बरी


 वेगवेगळी नावे ठेवत होती तिला

पण आज अशी वेळ आली एक शीट बुकिंग मिळू दे मला


कोठून तरी पावसाळ्यात ठिबुक ठिबुक गळायची

पण आले वारे किंवा पाऊस त्यातून रुबाबात पळायची


 शाळेच्या मुलांसाठी होती संजीवनी 

म्हणून आरामात जायची सगळी घ्यायला *वेळेत शिकवणी


 मुलींना मिळायचा हिचा मोफत पास

म्हणून एस टी होती त्यांना खास


 लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना मिळायचं हाफ तिकीट

आता ती बंद असल्याने खाजगी वाहन चालकांचं भरतंय पाकीट


ज्यांना कधी मिळत नसे ड्युटीमुळे घरी साजरा करायला सण

पण त्यांच्यामुळे अनेक परगावी नोकरदारांना घरी जायला भेटल्यामुळे होई समाधान मन


कधी होई पंक्चर , तर कधी पडे बंद

पण दुसरी मागवून साधला जाई प्रवाशांचा एकसंध


कधी प्रवासी , कधी मतदान पेट्या सोडी ती योग्य जागेवर

पण कधी आकारला नाही तिने जादा कर


कधी लॉंग, कधी डे , तर कधी नाईट अशा यांच्या शिफ्ट

पण कधी कोणी दिल नाही आपुलकीचे यांना गिफ्ट


कितीही करा प्रवास खाजगी तिकीट करून बुक

पण एस टी सारखं नाही मिळणार विश्वास आणि आपुलकीच सुख


लवकर धावू दे दिमाखात आपली सर्वांपुढे लालगाडी

 अभिमानाने पुन्हा होऊ दे प्रवाशांच्या सेवेत खडी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama