STORYMIRROR

Prashant Kadam

Drama

3.8  

Prashant Kadam

Drama

आपुलकीचं भांडण

आपुलकीचं भांडण

1 min
28.3K


आपुलकीचं भांडण

झाले ते खरे, बरे झाले

दोष कुणालाही नाही देत

ह्रदयातील निघाली भडास

शिल्लक काही नाही मनांत 


रागाचा जसा पारा चढला

उद्रेक ही झाला शब्दांचा

आरोपांच्या फैरी झडल्या 

भडीमार झाला प्रत्यारोपांचा


खानदानांचा झाला उद्धार

उद्रुत झाल्या दोष उणीवा

बाकी नाही राहिले कुणी

ठेवली नाही कुणाची पर्वा


काढली सर्व मनातील सल

संपवला जणू मधला तीढा

द्वेश संपूर्णच केला रिता

ठेवली नाही पाठी पीडा


काही काळ असेल अबोला

थोडे दिवस राहतील रूसवे

शांत राहणे नेहमी चांगले 

प्रेम वाढते , मग बोलावे


भांडणातूनच दोष समजतात

झालेल्या चूका, ही कळतात

आपुलकीचं भांडण जे करतात

पती-पत्नी त्यांनाच म्हणतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama