तरंगिणी : लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा
खरे तिच्या मनातले कळेल का कधी तरी असा दिवस असेल का
उरातले स्वप्न जरी मनातली अशी परी कधी मला मिळेल का
दिवास्वप्नातली छबी खरोखरी बघायला समोर मज दिसेल का
तिचीच साथ लाभली बरोबरी जगायला असे कधी घडेल का
भितीच वाटते तशी निघून ती कधी उगा कुठे तरी लपायची
विना तिच्या बरे कसे जगायचे कुणा कडून जरा तरी कळेल का
बघून फक्त लाजली खुणावताच हासली तसेच खास वाटले
जशी लगेच भाळली स्वरात ह्या सुखावली तशी मला फळेल का
तुझीच वाट पाहतो तुझाच जप सभोवती सतत वसे मनात तू
सुरात सूर भेटती तशीच मग झकास तार सांगना जुळेल का
प्रशांत कदम,
०८-०१-२०२५