विसरलो मी
विसरलो मी


राग आता ठेवलेले, विसरलो मी
घाव सारे सोसलेले, विसरलो मी
दूर ते किल्मीश केले, शांततेने
टोमणे ते मारलेले विसरलो मी
ज्ञात नाही आज पूर्वी बोचलेले
पूर्ण सारे भोगलेले विसरलो मी
कार्य हाती घेतले मी एकतेचे
दुष्मना नी वागलेले विसरलो मी
सर्व काही होत आहे योजलेले
स्वप्न आता भंगलेले विसरलो मी