Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Others

3  

Prashant Kadam

Others

बंद दारं

बंद दारं

2 mins
261


पूर्वी बहुतेक लोक चाळीत रहायची

एकाच मजल्यावर दहा कुटुंब असायची

दार सर्वांची सतत उघडीच असायची

सर्व एकमेकांकडे कधीही जात येत असायचे

सर्वच एकमेकांच्या संपर्कात सतत असायचे

एकमेकांशी सगळ्यांचे सुसंवाद असायचे

सणवार एकत्र हसत साजरे करायचे

घराघरात गोडधोडाचे आदानप्रदान करायचे

अडीअडचणीत एकमेकांची मदत करायचे

सगळेच कसे आनंदात उत्साहात रहायचे

शेजारधर्म प्रथम अगत्याने पाळायचे

कालांतराने उत्पन्नात प्रगती झाली

तिच लोक फ्लॅट मध्ये रहावयास गेली

इमारतीत 2बीएचके फ्लॅट मध्ये राहू लागली

स्वतंत्र, इतर कुटुंबां पासून अलिप्त राहू लागली

एका मजल्यावर फक्त दोन किंवा चार

परंतू बंद झाली होती प्रत्येकाची दारं

तुटला गेला एकमेकांशी असलेला संपर्क

जणू घडवणार होता एक वेगळाच अनर्थ.

कुटुंब झाली अलिप्त एकमेकांशी अनभिज्ञ

शेजारधर्मच विसरत गेली, जरी होती ती सुज्ञ

प्रत्येक कुटुंब राहू लागल आपल्या घरात व्यस्त

राहणीमान उंचावल्यामुळे उत्पन्न शोधण्यात

त्रस्त शेजारी कोण रहात हेच माहीत नसत आताशी

प्रत्येक जण श्रेष्ठ कोणीच बोलत नाहीत कोणाशी

एकलकोंडी कुटुंब झाली, आपल्यातच रमू लागली

मी भला, माझं कुटुंब भलं इतरांशी दूर राहू लागली.

इथपर्यंत ही ठिक होत, पण आता चिंता आहे वेगळी

फ्लॅटची दार बंद होतीच, घरातील दार ही बंद झाली

राहणीमान उंचावतानाच आपलेपणा ही विसरली

कामातील व्यस्ततेने एकमेकांशी दुरावली गेली

गृहकर्जाच्या येणा-या हप्त्याच्या आठवणींने त्रस्त,

त्यामुळेच पती पत्नी आपापल्या कामात व्यस्त

मुल फोन वरच आपला जीव रमविण्यात मश्गुल

कोणालाच कोणाचा थांगपत्ता नाही बिलकूल

प्रत्येक जण आपल्या रूमच दार करून घेतोय बंद

आपल्या रूम मध्ये जोपासतोय आपलाच छंद.

तेंव्हा शेजारी शेजा-यापासून झाला होता अलग

आता आप्त स्वकीय होताहेत एकमेकांपासून विलग

आहे ही बाब आहे अत्यंत चिंताजनक अन् गंभीर

दखल घ्यायला हवी प्रत्येकाने होण्या आधी उशीर

नातेसंबंधातील दुरावा कमी करून जवळीक साधावी

एकमेकांना वेळ देवून प्रेम भावना निर्माण करावी

मनाची अन् घराची दारं उघडून मित्रत्वाचे नाते जोडावे

ताणतणाव दूर लोटून सहकार्यातून स्नेह भाव जपावे.


Rate this content
Log in