वृत्त - आनंदकंद
लगावली - गागालगा लगागा गागालगा लगागा
*लपवायचे कशाला -*
तुजवीण सांग आता, जागायचे कशाला
स्वप्नात पाहिलेले, रुजवायचे कशाला
नसलीस तू समोरी, पाषाण विश्व वाटे
मग खास मी स्वत:ला, हसवायचे कशाला
वाटे मनात माझ्या, बांधेन ताज मी ही
पण तूच ना इथे तर, घडवायचे कशाला
ये तू फिरून मागे, सोडून राग माझा
सखये अशा सख्याला, रडवायचे कशाला
मैत्री करू नव्याने, प्रेमात दंग होवू
दोघांतले ग नाते, लपवायचे कशाला
*प्रशांत कदम,*
२४-११-२०२५
9594572555.