छंद !!
अंतर्मुख तुझा असा जाहलो नाही दिसले जरी तुला
प्रेमात तुझ्या पडलो आता नाही रुचले जरी तुला
मागे मागे तुझ्या लागणे आवडते बघ खास मला
असाच मोठा छंद लागला नाही पटले जरी तुला
तुझ्याच पायी वेड लागले नसतोच कधी मी माझा
विसरून गेलो जगास सा-या नाही कळले जरी तुला
असा कसा मज लळा लागला सांगशील का प्रिये मला
येण्याची मी वाट पाहतो नाही जमले जरी तुला
खात्री माझी इतकी आहे तुही गुंतली खरोखरी
आलिंगन मज अपसुक देशी नाही म्हटले जरी तुला
प्रशांत कदम,
१६-०९-२०२५.
९५९४५७२५५५.