गझल .
वृत्त - हिरण्यकेशी -
लगावली -
लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
नकळत सारी कमाल झाली !!
असे कसे ते घडून गेले मनात माझ्या भरून आले
नकळत सारी कमाल झाली मना प्रमाणे जुळून आले
खरेच आता नकोच चिंता कशास व्हावी मनात खळबळ
असाच मोठा विकास झाला घरात सुंदर घडून आले
परोपकारी अशीच वृत्ती जगात नांदो खुशी व शांती
नकोच माया न मोह आता असेच काही दिसून आले
भ्रमात आता न राहता मी श्रमात फिरूनी जगू म्हणालो
अचूक तेंव्हा घडतच गेले फुला प्रमाणे खुलून आले
प्रशांत म्हणतो तसा प्रयत्ने सदा करावा रियाज आपण
मिळेल यश मग लगेच सारे खरेच आता कळून आले
प्रशांत कदम,
१३-०४-२०२५