STORYMIRROR

Prashant Kadam

Classics

3  

Prashant Kadam

Classics

चुकलेच माझे गझल

चुकलेच माझे गझल

1 min
233

गालगागा गालगा गागालगागा

चुकलेच माझे !! 

का उगा मी भांडलो चुकलेच माझे

आर्ततेने बोललो चुकलेच माझे

स्वार्थ माझा कोणता कळलेच नव्हते

पण तरी रागावलो चुकलेच माझे

सोडला जो मार्ग तू सच्चेपणाचा 

ऐकुनी भांबावलो चुकलेच माझे

फक्त होती पूर्णता शंका जगाला

एकटा मी त्रासलो चुकलेच माझे

लोक करती पण गुन्हे याहून मोठे

का तरी मी तापलो चुकलेच माझे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics