STORYMIRROR

Prashant Kadam

Romance Classics Inspirational

4  

Prashant Kadam

Romance Classics Inspirational

आशा !

आशा !

1 min
22


प्रशांत गझल - वृत्त- आनंदकंद 
आशा !! 

पाहून आरसा ती रिझवत जनास गेली
माधुर्य गोड भारी रुजवत मनात गेली    

समईस पाहता बघ, आशा सुरात आली 
अन् वात तेवती वर फुलवत प्रकाश गेली

सारेच गूण अंगी नाही कमी कशाची
देवून झलक सारी खुलवत मनास गेली 

गावून गोड गाणी ह्रदयांत राज्य केले
राणीच ती स्वरांची मोहवून जनास गेली 

कष्टात वाढलेली मोठी परी मनाची
आनंद देत जगली हसवत जगास गेली 

प्रशांत कदम,
१४-०४-२०२६.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance