नाही तमा कुणाला सोसायचे कशाला
शब्दास मोल नाही बोलायचे कशाला
वाटे जसे मनाला ते ते तसे करावे
पण घाबरून सांगा थांबायचे कशाला
स्फुरले तसेच सारे आता लिहून ठेवा
शब्दांस आपल्या मग खोडायचे कशाला
नाते जुळेल जेंव्हा देवा समोर जावे
स्वर्गातलेच धागे तोडायचे कशाला
जन हित असेच असते नियमात बांधलेले
ते सर्व अनुसराना मोडायचे कशाला