अंधश्रद्धा
अंधश्रद्धा


नका उगाच
मानू या रीति भाती
वसली भिती.
दूर कराल
जीवनी हा अंधार
ज्ञान आधार.
भूतबाधा ही
वसे मनीचे ठसे
विचारा कसे.
परंपरा ही
बुरख्यात घावली
गोड बावली.
जन्मण्या जीव
अंगारे धुपारे ही
असे राख ही.
केसात जट
काढतो पळवाट
भट हा देव.
उघडा डोळे
भोंगळ हे सोहळे
मुक्याचा बळी.