STORYMIRROR

swati Chaudhari

Others

3  

swati Chaudhari

Others

गुरु शिष्याचं नातं

गुरु शिष्याचं नातं

1 min
365

गुरु शिष्याचं नातं हे जसं

जसं कुंभाराचं नि मातीचं

भिती अदराची अशी जणू

जणू उमले फूल प्रितिचं.।।१।।


गुरु शिष्याचं नातं हे जसं

जसं भुमीचं नि आभाळाचं

पडता बीज उदरी कोंब

कोंब फुटे गर्भात बाळाचं.।।२।।


गुरु शिष्याचं नातं हे जसं

जसं चंद्राचं अन सूर्याचं

चांदन्यातुनी चमके तारा

तारा हे तर फूल कर्णाचं.।।३।।


गुरु शिष्याचं नातं हे जसं

जसं द्रोणाचार्य एकलव्य

गुरु शिष्य परंपरा हीच

हीच निष्ठा दावी एकलव्य.।।४।।


Rate this content
Log in