प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे काय असतं?


शाळेतलं पहिल्या बाकावरुन उडून जाणारे पाखरु असतं.
बालपणातलं भतुकलीच्या खेळातलं
डॉक्टर, टीचर असतं.
कधी कॉलेजातलं तारुण्य असतं.।।१।।
एकमेकांची एकमेकांना असणारी ओढ़ असतं.
गावातून लग्न करून जाणारं अश्रु असतं.
चौकातल्या कढ़ाईत डुम्बनारं बटाटा वडा असतं.
तर कधी चहात पडणारी साखर असतं.।।२।।
कधी दूर कधी जवळ असतं.
चित्रपटातलं मोह, माया,काल्पनिक असतं.
कसंही असलं तरी ते प्रेम असतं.।।३।।
कधी त्याग असतं.
कधी सोबत असतं.
मनाने केलेली प्रार्थना असतं.
समोरच्याने पळवलेलं काळीज असतं.।।४।।
जीवनाचं गुपित असतं.
निसर्गाने साधलेला डाव असतं.
तुझी माझी साथ असतं.।।५।।
आई-बापाचं गगनात भरारी घेणारे अग्निपंख असतं.
नवरा-बायकोची संसारात तरणारी नाव असतं.
म्हतारपणाची आधाराची काठी असतं.
सोबतीच्या आठवणीचा खजिना असतं.।।६।।