STORYMIRROR

swati Chaudhari

Others

4  

swati Chaudhari

Others

मातृभूमी

मातृभूमी

1 min
409

कडे कपाऱ्याही गाती

परतंत्र्यातल्या राती

जपली मस्तकी माती

मायभूमितली नाती.।।१।।


स्वराज्याचा हा रक्षक

जाणता राजा दक्षक

शत्रू भुकेला भक्षक

हा मावळ्याचा लक्षक.।।२।।


देशाचे खरे तारक

घडले क्रांतिकारक

सांगती गाथा स्मारक

इति हा भावी बालक.।।३।।


नववधू परि माता

विविध अंगी समता

नांदते येथे ममता

विविध भाषी जनता.।।४।।


वायू, जल,भू नौदल

राही उभे दल दल

मृत्यु दारी हर पल

देशप्रेम हेच बल.।।५।।


गानकोकिळा ही गाते

नभ भरारी स्त्री घेते

किसान भुमीचे नाते

वंदन तुजला माते.।।६।।

     ***


Rate this content
Log in