कवितेचे नाव :-कलियुग लागलंय बदलायला...
कवितेचे नाव :-कलियुग लागलंय बदलायला...
कलियुग लागलंय बदलायला हो
कलियुग लागलंय बदलायला।।धृ।।
आधी होते रॉकेलचे दिवे
आता आले लाईटचे दिवे
लागलेत लुकलुक करायला हो।।१।।
आधी होते फेट्यावाले
नंतर आले टोपीवाले
लागलेत शायनिंग मारायला हो।।२।।
आधी होत्या सायकलगाड्या
आता आल्यात मोटारगाड्या
लागल्यात हॉर्न वाजवायला हो।।३।।
आधी होत्या नववार साडया
आता आल्या सहावार साडया
लागल्यात वार धरायला हो।।४।।
आधी होत्या कुंकवावाल्या
आता आल्यात टिकल्यावाल्या
लागल्यात भिंती रंगवायला हो।।५।।
आधी होत्या सुगरण आया
आता आल्यात कामवाल्या बाया
लागल्यात पाणी पाजायला हो।।६।।
आधी होते चष्मयावाले
आता आलेत गॉगलवाले
लागलेत डोळे मिच्कवायला हो।।७।।