बहीण भावाचं नातं...
बहीण भावाचं नातं...

1 min

29
तु भांडायचं मी समजवायचं.
तु लपायचं मी शोधायचं.
तु चिडायचं मी रागवायचं.
तु शिक्षणासाठी लांब जायचं।।१।।
मी रिवाजासाठी परक्याघरी जायचं.
तिथेच माझं घर सजवायचं.
भातुकलीचं घर लहानपणीचं मोडायचं.
तु हळूच यायचं पहायचं।।२।।
मी माहेरी यायचं राहायचं.
न कळत नातं टिपायचं.
बा गत तु जपायचं.
मी हसायचं आनंदी राहायचं।।३।।
एका धाग्यात सुखदुःख विणायचं.
औक्षण करून मनगटी बांधायचं.
एक वचन सद्बुद्धिचं समृद्धिचं.
रक्षाबंधन स्नेहाचं...
नातं लाखमोलाचं।।।।४।।