आजीची सही
आजीची सही


अभ्यास करताना तिची नजर
मला उगीच हेरायची,
मी पाहताच भूगोलाचं
पुस्तक उलट धरायची.
मी सुलटं करत
तिला वेडी म्हणायची,
पण मीच वेडी होते
ती फक्त चित्रच बघायची।।१।।
मग कळलं मला
ती अडाणी होती,
पण गावात ती शहाणी होती.
अंगठ्याने गाव चालवायची
अन् नजरेनं फिरवायची।।२।।
मग मी म्हणायची तिला,
तू शिकव मला चपाती फुगवायची,
मी शिकविन तुला
पाटीवर पेन्सिल गिरवायची
तिनं आमची सकाळीच
तिच्यासवे शाळा भरायची
अन् संध्याकाळी तिची नजर
जणू आमची वाटच पहायची।।३।।
मग ती देवळात कधी बागेत
फिरायला घेऊन जायची अन्
आम्ही अभ्यासाला बसताना
पाटीकडं काण्याडोळ्यानं पहायची
मग तिला हळूच पेन्सिल खुणवायची
आता या वयात ती तिचं नाव गिरवायची
अन् आजोबा तिला चिडवून म्हणायचे
आता काय तुला मिरवायची ।।४।।