★गिफ्ट:तुझ्या-माझ्यातलं प्रेम★
★गिफ्ट:तुझ्या-माझ्यातलं प्रेम★


तुझ्या-माझ्यातलं प्रेम
एक गिफ्ट असू देत.
कधी ते eclears
कधी ते alpenlable असू देत.
तुझ्या माझ्यातलं प्रेम
एक चॉकलेट असू देत.।।१।।
तुझ्या माझ्यातलं प्रेम
एक सेंट असू देत.
कधी ते गुलाब
कधी मोगरा असू देत.
तुझ्यामाझ्यातलं प्रेम
एक फूल असू देत.।।२।।
तुझ्यामाझ्यातलं प्रेम
एक बेल्ट असू देत.
कधी तो सैल
कधी घट्ट असू देत.
संसारात फक्त मी
तुझ्या मुठीत नाही
मिठीत असू देत.।।३।।
तुझ्या माझ्यातलं प्रेम
एक गॉगल असू देत.
दुर्बिणीसारखं त्यात
मनातलं दिसू देत.
ओठांवर नसलं तरी
डोळ्यात दिसू देत.
न पाहता तुला
ते मला कळू देत.।।४।।
तुझ्या माझ्यातलं प्रेम
एक घड्याळ असू देत.
कीतीही पुढं गेलं
तरी क्षणाक्षणाला ते
सोबत असू देत.
जीवनाच्या सुखदुःखात
त्याची टिकटिकणारी साथ
मला कायम असू देत.।।५।।
तुझ्यामाझ्यातलं प्रेम
फक्त प्रेम असू देत.
आयुष्याचं अकाऊंट पाहताना
त्यात कायम बॅलन्स असू देत.
तू नसतानाही सोबत
प्रेमाच्या आठवणींचा
खजिना कायम
सोबतीला असू देत.।।६।।