लघुकथा-आली गं दारा माझी गौराई
लघुकथा-आली गं दारा माझी गौराई


आज कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यंदा घरी गौराई कशी आणावी सुजाताला खूप मोठा प्रश्न पडला होता. तिने सासुबाईंसमोर हा विचार मांडला.
त्यावर ससुबाई, "अगं वेडाबाई गणपती आले की, गौराई आलीच. आपली परंपरा आहे ती. कोरोनाच्या काळात आपणास जमाव टाळायचा आहे. सण-उत्सव नाही. आपण असं करुयात, सुंदर देखावा बनवूयात "घरी राहा,सुखरूप राहा" आणि तुझे काय ते फेसबुक, व्हाट्सअप त्यावर फ़ोटो टाकुयात. आपल्या घरी महालक्ष्मी येईल आणि समाजात जागृती."
सुजातालाही सासुबाईचे म्हणणे पटले, समाजाची बंधने आपल्या हितासाठी असतात हा विचार करत ती उत्साहात गौराईच्या अगमनाची तयारी करू लागली.