गोवा राज्य !!
गोवा राज्य !!
बघावं तर जिथे तिथे
ह्या पर्यटकांची गर्दी
निसर्गाचे सोज्वळ रूप पाहण्यास
त्यांची पाऊले गोव्याकडे वळती!!धृ!!
नाही गेलो कधी मी तिथे
नाही बघू शकलो ते रूप
साहित्य संमेलनाच्या ह्या शुभ मुहूर्तावर
आता तरी पाहू शकतो ते स्वरूप!!१!!
राज्याची महती ही महान
गोव्याची असे वेगळीच शान
एकोप्याची जणू ही खाण
हिंदू-ख्रिश्चन ह्यांची ही ऐतिहासिक वाण!!२!!
गोव्याचा हा मासोळी किनारा
मास्यांची ही लघबघती शाळा
पर्यटकांचा हा आनंद वेगळा
खवय्यांच्या होतो सण-सोहळा!!३!!
स्वर्गापरी भासावे आणि मनात वसावे
निरनिराळ्या रंगात आपलेसे व्हावे
कधी इथे तर कधी तिथे न करता
एकच इच्छा आहे की…..
ह्या गोवा राज्यात आपले घर असावे
ह्या गोवा राज्यात आपले घर असावे!!४!!