निसर्ग!!
निसर्ग!!


असा वसंत फुलला
औचित्य साधुनी आला
कोवळे स्पर्श हवेचे
देऊनी हा विहरला!!धृ!!
कोमल हे स्पर्श त्याचे
थंडावा अंगी दाटतो
मन हर्षुनी नात्यात
आनंद द्विगुणी होतो!!१!!
सोहळे पशू-पक्ष्यांचे
उत्साहात पूर्ण होते
माणसाचे तसेच हो
आठवणीत राहते!!२!!
सोनेरी क्षण म्हणावे
हे वसंतात पाहावे
दृष्टीने न्याहाळत ते
मनात हे साठवावे!!३!!
वर्णावे तेवढे कमी
निसर्गाचा सण आहे
प्रत्येक वर्षी एकदा
स्नेहाचा हा रंग आहे
स्नेहाचा हा रंग आहे!!४!!