Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Seema Pansare

Classics


5.0  

Seema Pansare

Classics


गवळण लोककाव्य

गवळण लोककाव्य

1 min 490 1 min 490

गवळण ग गवळण मी गवळण ग

गोकुळची मी गवळण ग

प्रेमागाईचं मी दूध काढले

साईची साठवण करत राहिले


ममतेने दही जमवले

विश्वासाने ते घुसळले

गवळण ग मी गवळण ग

गोकुळची मी गवळण ग


धीराचे ते शुभ्र नवनीत जमले 

धीटाईने ते धूर्तपणे 

नवलाईच्या कढईत कढवले

गवळण ग मी गवळण ग

गोकुळची ग मी गवळण ग


आस लागली ती रवाळ

गावरान तुपाची

गोड गोड त्या घासाची.

त्या नितळ रूपाची

गवळण.......


वाट धरीन मी मथुरेची

खपत होईल बाई तुपाची

रास चढेल बाई पैक्याची

गवळण......


खाईल तूप जो प्रेमागाईचं

धरील रूप तो इंद्रनगरीच

गवळण ग मी गवळण ग


Rate this content
Log in

More marathi poem from Seema Pansare

Similar marathi poem from Classics