तिला त्याची जाण आहे
तिला त्याची जाण आहे
मन कधी घट्ट करावे
कधी सैल सोडावे
याची जाण तिला आहे .
राब राब राबावे.
मग ती शेतकरी असो
उद्योगिनी असो ,
वकील ,शिक्षिका, डॉक्टर असो
कष्ट हेचि तिला ठावे
घरच्या मोठ्या पुरुषांमध्ये
विषयाची जाण असूनही
नाही बोलावे ही जाण तिला आहे
हे उच्च संस्कार तिच्यावर आहे
असे संस्कार करणारी ही
तीच ती ... ती आहे
हेच सुसंस्कार ती पुढे नेत आहे
पुढच्या ती ला ती देत आहे.
