संस्कार
संस्कार
तिच्या नजरेत धाक असायचा
फक्त डोळे मोठे केलेतरी
समजुन घ्यायचे .
ती शिक्षा ही करायची
पण त्यातून ही काही तरी
आपलेच भले व्हायचे
ती ची माया तिचे प्रेम
विलक्षण ते दिसायचे नाही
त्याची दिव्य जाणीव व्हायची
अशी आई सर्वांचीच असते बहुतेक
माझी तर आहे तुमची कशी हो आहे?
नक्की अशीच असणार.
