"आजची स्त्री कशी असावी"
"आजची स्त्री कशी असावी"
आजची स्त्री ही चूल अन् फक्त मूल सांभाळणारी नसावी,
तर ती इंदिरा गांधी सारखी आयन॔ लेडी असावी,
सावित्रीबाई फुलेसारखी लेखनीलाच आपले सव॔स्व मानणारी असावी,
राणी लक्ष्मीबाईसारखी आपल्या तलवारीने आपल्या सभोवतालच्या राक्षसाचा वध करणारी असावी,
एवढेच काय तर आई जिजाऊसारखी आपल्या मुलांवर राजे शिवाजीसारखे संस्कार करणारी असावी,
वेळ आलीच तर आहिल्याबाई होळकरांसारखी आपले घर (राज्य) स्वबळावर सांभाळणारी असावी,
मदर तेरेसा सारखी प्रेमळ असावी, कल्पना चावला सारखी कणखर असावी
याचाच अर्थ आजची स्त्री ही पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून
प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाचा ठसा उमटवणारी असावी आजची स्त्री अशीच असावी
